Posts

Showing posts from July, 2021
Image
  श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री बाळाप्पा महाराज जन्म:  ज्ञात नाही  आई/वडील:  ज्ञात नाही  गुरू:  श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट शिष्य:  गंगाधर महाराज  समाधी:  १९१० बाळाप्पा महाराज हे मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील. ते ब्राह्मण कुळातील असूनही सावकारी व्यवसायात होते. ते सोनारी व्यवसायाही करीत. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि सद्गुरूंच्या शोधात ते श्रीक्षेत्र गाणगापूरी रवाना झाले. तसे तर ते गावात एक धनाढ्य म्हणून नावारूपाला आलेले होते. थोरल्या मुलीचा विवाह व मुलाची मुंज आटोपून घरदाराचा त्याग करून सद्गुरू शोधार्थ ते बाहेर पडले. मुरगोडहुन गाणगापूरला गेले. अनुष्ठान केले. एका ब्राम्हणाने बाळाप्पाना स्वप्नात येऊन सांगितले. 'तुम्ही अक्कलकोटी जाऊन स्वामी समर्थांची सेवा करावी.' अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी एक पैशाची खडीसाखर घेतली. स्वप्नात पाहिलेल्या मूर्ती प्रमाणेच स्वामींची मूर्ती पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्रीनाही खूप आनंद झाला. त्यांनी या झाडास मिठी म।र अशी कृती कर...

हेमाडपंती मंदिरे सांगतात गोसाव्यांची कहाणी, या शतकातील वारसा दुर्लक्षित

Image
Tuesday, July 27, 2021  हेमाडपंती मंदिरे सांगतात गोसाव्यांची कहाणी, या शतकातील वारसा दुर्लक्षित  Jun 19, 2020 By उदय राऊत या मंदिरात भगवान विष्णू, श्रीगणेश आणि विठ्ठल रुक्‍मिणीसह अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भंडारा शहराच्या वैभवात भर पाडणारे हे वास्तुशिल्प 800 वर्षे जुने असून, हेमाडपंती वास्तुशैलीने बांधलेले आहे. या मंदिर समूहाचे संवर्धन होण्याची गरज आहे.  भंडारा : ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा वारसा सांगणारी अनेक स्थळे जिल्ह्यात आहेत. शहरातील मेंढा परिसरातील हेमाडपंती मठमंदिरे हेसुद्धा त्यातील एक. गिरी-गोसावी यांची अत्यंत कलात्मक, सुंदर मठ आणि मंदिर समूह या ठिकाणी आहेत. कालौघात या मंदिरांवर काजळी चढली असली तरी त्यांचे रेखीव सौंदर्य डोळ्यात भरणारे आहे. पुरातत्त्व विभागाने हा प्राचीन ठेवा आपल्या ताब्यात घेतला असून, त्याचे अस्तित्व व वारसा जतन करण्यासाठी आणखी विकासकामे करणे अपेक्षित आहे.  या मंदिरात भगवान विष्णू, श्रीगणेश आणि विठ्ठल रुक्‍मिणीसह अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भंडारा शहराच्या वैभवात भर पाडणारे हे वास्तुशिल्प 800 वर्षे जुने असून, हेमाडपंती वास्तुशै...