मुर्ती कशा ओळखायच्या?
मुर्ती कशा ओळखायच्या? Maharashtra Times | Updated: 10 Jul 2016, 03:07:00 AM घरापासून मंदिरांपर्यंत अनेक मूर्ती आपण बघत असतो. या मूर्ती सरावाने आपण ओळखतो. तरीही अनेक मूर्तींची ओळख आपल्याला सहजासहजी पटत नाही. म्हणूनच विविध देवतांची चिह्नं जाणून घेतली, तर मूर्ती ओळखणं एकदम सोपं होऊन जाईल. डॉ. किरण देशमुख सभोवतालचा सोसाट्याचा वारा (वायू), आकाशात अचानक चमकणारी वीज (अग्नी), धो-धो पडणारा पाऊस (वरुण) इ. भौगोलिक चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे न कळल्यामुळे, प्राथमिक अवस्थेतील मानवाने त्या सर्वांना ‘देवत्व’ दिले आणि ३३ देवांची ३ गटांत निर्मिती झाली. पुढे माणसाने स्वतःच्या कल्पनाविश्वातून देवांची संख्या ३३ कोटी केली. त्याचबरोबर देवांचे निवासस्थान असणारे देवघर आणि देवालये यांचेही आकार व प्रकार वाढवले. शिवाय, त्यातूनच इष्ट देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी देवांच्या मूर्तींची संकल्पना पुढे आली. साहजिकच मग देव मूर्ती कशा स्वरूपात करायच्या? कोणत्या वस्तू वा धातूंपासून तयार करावयाच्या? त्यांची उपासना कशी करायची? याविषयीचे मूर्तिशास्त्र व धर्मशास्त्रही तया...