वीर रस - महिषासुरमर्दिनी : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra बलपराक्रमशक्तीप्रतापप्रभावादीभिर्विभावैरुत्पद्यते बल, पराक्रम, शक्ती, प्रताप आणि प्रभाव या विभावांमुळे ज्या रसाचा उद्भव होतो, तो म्हणजे वीर रस. उत्साह हा वीर रसाचा स्थायीभाव आहे, त्यामुळे याला सात्विकता लाभली आहे. दया-वीर, दान-वीर, धर्म-वीर आणि युद्ध-वीर असे वीर रसातील विविध भाव व्यक्त होतात. याशिवाय असुर वीर आणि लोभ वीर या संकल्पनाही वीर रसाशी निगडीत आहेत. अर्थात देवीचे युद्ध वीर स्वरूपातील रणरागिणीचे रूप शिल्पकारांनी महिषासुरमर्दिनीच्या शिल्पांमधून अभिव्यक्त केले आहे. नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत पूर्वी प्रस्तुत झालेल्या देवीच्या शृंगार , हास्य , करुण आणि रौद्र रसापेक्षा वीर रसातील महिषासुरमर्दिनी स्वरूपाची लोकप्रियता भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून दिसते. त्यामुळे प्राचीन नाण्यांवर, मंदिराच्या बाह्य भिंतींवर, स्वतंत्र शिल्प रूपामध्ये किंवा चित्र रूपामध्ये दुर्गेचे दर्शन होते. महिषासुरमर्दिनी देवी दुर्गेचा उद्भव महिषासुराचा विनाश करण्यासाठीच झाला होता. देवी दुर...
Comments
Post a Comment